लोणावळा महाबळेश्वर ला जाऊन उबलात ! तर मग पुण्यातील या ५ ठिकाणी नक्की भेट द्या !!
पुणे हे सांस्कृतिक आणि शेक्षणिक वारसा जपणारा शहर आहे . तीनही ऋतू मध्ये निसर्गयरम्य ठीकाणांनी भरलेल शहर म्हणजे आपलं पुणे शहर .विशेषतः पावसाळा आला कि पुणेकरांना ताम्हिणी घाट , महाबळेश्वर , लोणावळा या ठिकाणांची ओढ लागते .परंतु पुण्याजवळच अशी काही ठिकाणे आहेत जिथे अतिशय मनमोहक नैसर्गिक धबधबे , डोंगर रांगा आणि नदीपात्र असून पर्यटकांपासून या जागा लपून राहिल्या आहेत .किंव्हा अगदी थोड्याच लोकांना या विषयी माहिती आहे . वर्दळ कमी असल्याने अश्या ठिकाणी जाताना हिरवीगार दाट झाडे , नदीपात्राचा मंद प्रवाह आणि पक्षांचा किलबिलाट अगदी मनसोक्त अनुभवता येतो .तर चला पाहुयात कुठली आहेत हि ठिकाणे .
1) पाथरशेत – ( अंतर - पुण्यापासून 60 कि.मी )
कसे पोहचायचे - प्रायव्हेट वाहन - पुणे बंगलोर रोड पासून सिंहगड रोड कडे जाताना वेल्हे पानशेत रोड ने सरळ जाता येईल.
बेस्ट सिझन - मान्सून
2) सदावाघापूर – (पुण्यापासून अंतर - 150 कि.मी )
कसे पोहचायचे - साताऱ्या पासून पुढे बोरगाव पार करून नागठाणे रोड पासून सासपाडे रोड घ्यावा.
बेस्ट सिझन - वर्षभर

साताऱ्या मधील पाटण तालुक्यातील सदा वाघापूर हे ठिकाण भल्या मोठ्या पवन चक्क्यानंसाठी प्रसिद्ध आहे .पठारांवर उभारलेल्या पावन चक्क्यां पावसाळ्यात दाटलेल्या धुक्यात अतिशय सुंदर दृश्य निर्माण करतात .या ठिकाणी सह्याद्री ची मोठं मोठी पाठारे आणि दऱ्या पाहायला मिळतात .पावसाळ्यात दिसणारा उलट धबधबा हे इथले प्रमुख आकर्षण आहे . हा धबधबा पाहायला येण्याऱ्यांची गर्दी आता हळू हळू वाढू लागली आहे .त्यासोबतच अनेक छोटे मोठे धबधबे हि पाहायला मिळतात . साताऱ्यातील कास पठारा प्रमाणेच या ठिकाणी हि वेगवेगळ्या रंगाच्या फुलांच्या चादरी पाहायला मिळतात .या गाव पर्यंत जाणारा रस्ता हि अतिशय निसर्ग रम्य असून या भागात मोरांचे प्रमाण जास्त असल्याने रस्त्यात काहीदा मोरांचे हि दर्शन होते .पावसाळ्या प्रमाणेच इतर ऋतूमध्ये हि या ठिकाणी वातावरण थंड असते .फॅमिली सोबत वने डे ट्रिप साठी हे एक उत्तम ठिकाण आहे . तसेच बाईक राईड ची आवड असणाऱ्यांना हि हे ठिकाण एक वेगळा अनुभव देते.
कसे पोहचायचे - प्रायव्हेट गाडी ने मुंबई-पुणे रोड ने डावीकडे वळून कान्हे या गावात यावे. तिथून सरळ रोड खांडी साठी जातो.
बेस्ट सिझन - मान्सून
खांडी हे ठिकाण पुण्यापासून 80 किलो मीटर वर तर, लोणावळा पासून 60 किलो मीटर च्या अंतरावर आहे.कान्हे या गावापासून 36 किमी अंतरावर हे ठिकाण असून महाबळेश्वर आणि लोणावळा प्रमाणेच पावसाळ्यात अनेक मोठे धबधबे इथे पाहायला मिळतात .जगताप वॉटरफॉल भेंडेवाडी वॉटरफॉल , लाळवंडी वॉटरफॉल असे काही वॉटरफल्स इथे प्रसिद्ध आहेत . भेंडेवाडी वॉटर फॉल हा सर्वाधिक प्रसिद्ध वॉटर फॉल आहे. वर्दळ कमी असल्याने धबधब्यात भिजण्याचा आनंद इथे मनमोकळे पनाने घेता येतो . तसेच अनेक छोटे छोटे धबधबे अगदी रस्त्या लगतच पाहायला मिळतात . रस्त्याच्या दोन्ही बाजूंना हिरवीगार शेती , वाहते धबधबे आणि डोंगरांच्या उंच कडांमुळे या ठिकाणाला विशिष्ट निसर्ग सौंदर्य लाभलेल आहे. खांडी पॉईंट हे येथील प्रमुख आकर्षण असून .या पॉईंट वरून सुंदर व्हॅली विहयू पाहता येतो .या ठिकाणी जाणारा रस्ता हि चांगल्या स्तिथी मध्ये असून हल्ली या भागात कॅम्पिंग हि चालू झाली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी राहण्याची आणि जेवणाची सोय हि केली जाते . पावसाळ्यात लोणावळा आणि ताम्हिणी मधील गर्दी टाळायची असेल आणि पाऊसाचा पुरेपूर आनंद घ्यायचा असेल तर खांडी हा नक्कीच उत्तम पर्याय आहे .
4) गारमाळ – (पुण्यापासून अंतर - ७० किमी)
कसे पोहचावे - खंडाळा पासून बोर घाट मार्गे
बेस्ट सिझन- मान्सून
5) चौराईदेवी मंदिर - ( अंतर - पुण्यापासून ३२ किमी )
कसे पोहचायचे - १) लोकल ट्रेन ने घोराडेश्वर स्टेशन ला उतरून ऑटो किंव्हा कॅब
२) प्रायव्हेट गाडी ने इमराल्ड रिसॉर्ट इथे पोहचावे. तिथून गाडी पार्क करून २० मिनिटांचा ट्रेक करून जावे .
बेस्ट सिझन- वर्षभर




